Ad will apear here
Next
वसंत चिपळूणकर यांना गुणवंत कामगार पुरस्कार
चिपळूण : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार वसंत लक्ष्मण चिपळूणकर यांना जाहीर झाला आहे.

चिपळूणकर हे गाणे-खाडपोली औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल्स कंपनीतील इलेक्ट्रिकल विभागात काम करतात. त्यांनी उत्पादकता व गुणात्मकतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी इलेक्ट्रिकल इक्विमेंट्सचा वापर करताना ऊर्जा बचतीसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.

कोकणातील दुर्गम भागातील वीजप्रवाह सातत्याने खंडित झाल्यास पंपचालकांची होणारी दमछाक लक्षात घेऊन त्यांनी मोबाईल संचलित वॉटर पंप यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVDBI
Similar Posts
‘ग्लोबल चिपळूण’तर्फे ‘जलपर्यटन आणि क्रोकोडाइल सफारी’चे आयोजन चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीच्या तीरावर, शहराचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाच्या पायथ्याशी, गोवळकोट धक्का परिसरात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने २२ ते २६ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘चिपळूण बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाइल सफारी २०१८’ हा महोत्सव आयोजित केला आहे.
‘हमीद दलवाईंचे विचार विचार करायला लावणारे’ चिपळूण : ‘महात्मा गांधींनंतर ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांचे विचार विचार करायला लावणारे असल्याने त्यांचे हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यांच्या जीवनावरील माहितीपट तयार करत आहे,’ अशी माहिती दिग्दर्शिका व ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिली. दलवाई यांच्या जीवनावरील माहितीपटासाठी
धनंजय चितळेंच्या व्याख्यानाला रत्नागिरीत प्रतिसाद रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील श्री. गोविंद कृ. रानडे संस्कृत पाठशाळा येथे आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘श्री विष्णुसहस्रनामावरील आद्य शंकराचार्यांचे भाष्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर केल्यास वाचनसंस्कृतीला धोका नाही चिपळूण : ‘आधुनिक प्रसारमाध्यमांचा योग्य तो उपयोग करून घेतला, तर प्रकाशन व्यवसाय आणि मराठी वाचन संस्कृतीला कोणताही धोका नाही,’ असा सूर चिपळूणमध्ये भरलेल्या दुसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनातील परिसंवादात निघाला. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language